श्री गोपाळ गणपती देवस्थान फर्मागुडी,
सदर देवस्थानाचा इतिहास सव्वादोनशे वर्षाचा आहे. फर्मागुडीच्या टेकडीवर गावचे गुराखी (राखणे) आपली गुंर घेवुन दररोज येत असत. अशाच एके दिवशी एका झुडुपात राखण्याना (गुराख्यांना) पाशाणी मुर्ति नजरेस पडली, मुर्ति गणपतीची. राखण्यानी आपल्या इतर सवंगड्यांना ही वार्ता दिली. सगळ्यांनी एकवटुन गावाच्या जलम्याच्या हस्ते मुर्तिचि स्थापना एका छोट्याशा मंदिरात केली. राखणे (गुराखी) आपल्या परीने गणपतीच्या सेवेस रुजु झाले. कालांतराने राखण्यानी गणेश चतुर्थी उत्सव सुरु केला, उत्सव अनंतचतुर्थी पर्यन्त असत, तो तसाच चालू आहे. या उत्सवात राखणे श्रींचा प्रसाद घेवुन शेजारच्या मार्दोळ,कुंडंई,फोंडा , दुर्भाट इत्यादि गावात घरोघरी जात असत, भाविक आपले नवस राखण्याकडे सागंत आणि नवस फेडायला अनंतचतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या दर्शनाला फर्मागुडीला येत असत. अशातरेने राखण्यानी घरोघरी श्रिंची महती घरोघरी नेली.
कालांतराने
गोवाभर या गणपतीची प्रचिलिती "राखण्याचा गणपती" म्हणून झाली. श्रीच्या दर्शनाला भक्तजन येऊ लागले .कालांतराने गोव्याचे पहिले मुख्यमंत्री कै. दयानंद बाळ्कृष्ण बांदोडकर उर्फ भाऊसाहेब बांदोडकर गणेश चतुर्थी उत्सवात श्रींच्या दर्शनाला आले व त्यांनी राखण्याना नविन देऊळ बांधून देण्याचं आश्वासन दिल . राखण्यांना दिलेल आश्वासन त्यांनी नवीन देवूळ बांदून देऊन पूर्ण केल.
नंतर
शके ८८, दि. २०/०५/१९६६ नवीन मुर्तीची स्थापना केली. देवस्थानच नामकरण “श्री. गोपाळ गणपती देवस्थान” करण्यात आल. भाऊसाहेब बांदोडकरांनी देऊळ रखण्याकडे सुपूर्द केल आणि देवस्थानच योग्यप्रकारे व्यवस्थापन करण्यास संगितले . मूळ मूर्तीची प्रतिस्थापना वैशाख शुक्ल चतुर्थी शके १९१३ दि. १७/०५/१९९१ रोजी करण्यात आली. यावेळी नागाची (ब्रह्माची) स्थापना चौरंगात करण्यात आली.
मुख्य देवस्थान श्री गोपाळ गणपती स्थापिलेल्या जागी असून त्याच्या समोर पेडावर नागदांपत्य (ब्रम्हा) याची स्थापना करण्यात आली आहे.
सदर
देवालयातील मुर्ती सुरूवातीस गोपाळ गणपती (राखण्याचा गणपती) या नावाने प्रचलित होता. कै. दयानंद बाळकृष्ण बांदोडकर यांनी राखण्याना नवीन देऊळ बांदून दिले . नंतर शके १८८८ दि. २०-०५-१९६६ रोजी गोव्याचे प्रथम मुख्यमंत्री श्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी नवीन मुर्तीची स्थापनाकेली .
मुळ
मुर्तीची प्रतिस्थापना वैशाख शुक्ल चतुर्थी शके १९१३ दि. १७ मे १९९१ रोजी नवीन मूर्तीच्या खाली करण्यात आली.