श्री गोपाळ गणपती देवस्थान फर्मागुडी,

सदर देवस्थानाचा इतिहास सव्वादोनशे वर्षाचा आहे. फर्मागुडीच्या टेकडीवर गावचे गुराखी (राखणे) आपली गुंर घेवुन दररोज येत असत. अशाच एके दिवशी एका झुडुपात राखण्याना (गुराख्यांना) पाशाणी मुर्ति नजरेस पडली, मुर्ति गणपतीची. राखण्यानी आपल्या इतर सवंगड्यांना ही वार्ता दिली. सगळ्यांनी एकवटुन गावाच्या जलम्याच्या हस्ते मुर्तिचि स्थापना एका छोट्याशा मंदिरात केली. राखणे (गुराखी) आपल्या परीने गणपतीच्या सेवेस रुजु झाले. कालांतराने राखण्यानी गणेश चतुर्थी उत्सव सुरु केला, उत्सव अनंतचतुर्थी पर्यन्त असत, तो तसाच चालू आहे. या उत्सवात राखणे श्रींचा प्रसाद घेवुन शेजारच्या मार्दोळ,कुंडंई,फोंडा , दुर्भाट इत्यादि गावात घरोघरी जात असत, भाविक आपले नवस राखण्याकडे सागंत आणि नवस फेडायला अनंतचतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या दर्शनाला फर्मागुडीला येत असत. अशातरेने राखण्यानी घरोघरी श्रिंची महती घरोघरी नेली.